जालना-शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.बैलांना गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात.

बळीराजा साठी दिवाळी एवढच महत्त्व या पोळासणाला आहे. कुठल्या समाजाचा अडसर देखील या  सणाला नाही. ज्याच्याकडे पशुधन आहे तो हा सण साजरा करणारच, मग तो नेता असो नोकरदार असो अथवा गरीब शेतकरी असो .पोळा सणाला त्याच्या आनंदाला उधाण येते.

केंद्रीय रेल्वे मंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील त्यांच्या जवखेडा या मूळ गावी हा पोळा साजरा केला त्यावेळी आमदार संतोष दानवे, सौभाग्यवती निर्मलाताई दानवे ,भास्कर दानवे ,यांचीही उपस्थिती होती. नेत्यांनी हा पोळा साजरा केला तसाच आणि त्याच आनंदामध्ये ग्रामीण भागात सर्वत्र हा पोळा साजरा करण्यात आला बळीराजाच्या या आनंदोत्सवात पुढे covid-19 च्या नियमांची मात्रा काही चालली नाही.

-दिलीप पोहनेरकर,edtv jalna,9422219172.

Share.

Comments are closed.

Exit mobile version