मोकाट फिरणाऱ्या 1031 रिकामटेकड्यांची अँटीजन चाचणी केल्या नंतर त्या पैकी 27 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.जालना शहरात पोलीस प्रशासनाने आठवडाभर राबविली मोहीम
जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनमध्ये मोकाटपणे फिरणाऱ्या रिकामटेकड्या लोकांची अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू आहे.जालना शहरातील विविध चौकात 19 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान सहा दिवसात 1031 जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये 1004 जण निगेटिव्ह आणि 27 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
मोकाट फिरणाऱ्या कोरोनाबाधितामुळेच शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अँटीजन चाचण्यांची मोहीम अधिक व्यापक करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
 उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी- अधिकारी महसूल आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला आहे.