जालना – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने अशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती  आणि ग्रामपंचायतीच्या वतीने लहान बालक आणि गरोदर महिलाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याच सोबत गाव कोरोना मुक्त झाल्यामुळे बंजारा समाजातील महिलांनी बंजारा नृत्य सादर करून जल्लोष साजरा केला .

“ताई चल माझ्या गावाला जाऊ ,सारं गाव फिरून येऊ” या गाण्यावर ठेका धरला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सैनिक उद्धव कायंदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन फुपाटे हे होते.ग्रामपंचायत मार्फत सर्वेक्षण झालेल्या महिलांना सकस आहाराच्या किट वाटप करण्यात आल्या.
उपसरपंच अविनाश राठोड यांनी गरोदर महिलांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तसेच युवक मंडळी ने “लस घ्या”या गाण्याच्या माध्यमातून गावात राहिलेल्या नागरिकांना लसीकरन करून घ्यावे अशी जाणीव  गाण्यातून केली आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा महिलानी नृत्य, लेंगी आणि भारूडच्या अनुशगाने कोरोनामुक्त “नायगाव” होत आहे., आपण आपले गाव कोरोनामुक्त करून देशाच्याया विकासामध्ये हात भार लावण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला ग्रामसेवक बाबासाहेब गवळी, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा खंदारे यांनी केले. तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक एस.बी जायभाय यांनी केले.

-edtv news jalna,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version