जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर मंठा तालुक्यातील वायाळ पांगरी येथील सतीश वायाळ हे गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे सव्वा सहा वाजेच्या सुमारास जालन्याहून परभणी कडे जाणारा एक कंटेनर पीरकल्याण पाटीजवळ देखभाल दुरुस्तीसाठी उभा होता. याच दरम्यान जालन्या कडूनच मंठा कडे जाणारी स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 20 सी आर 15 65 ने पाठीमागून कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की गाडीचा चुराडा होऊन ती पुन्हा जालन्या कडे तोंड करून उभी राहिली.

भोपाळ येथून 13 तारखेला निघालेला कंटेनर आंध्र प्रदेशातील मालवाडा येथे जाणार होता. चालक महेंद्र बिंद हे अजमगड येथील असून उत्तर प्रदेश चे रहिवाशी आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामध्ये या पटीवरील सखाराम मगर,, जाकिर सय्यद, पुरुषोत्तम गिराम, मुंशी सय्यद, यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच महामार्ग पोलिसांचे पथक पोलीस कॉन्स्टेबल बी. बी. गायकवाड, राठोड, गोरखनाथ दिघोळे ,अशोक कांबळे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.


-दिलीप पोहनेरकर,,9422219172

Share.

Comments are closed.

Exit mobile version