जालना- येथील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यलयात आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत सनई चौघड्यांच्या निनादात आणि पुष्पवृष्टी करून करण्यात आले.

शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस .पारंपारिक वाद्य निनादात संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.गेल्या सतरा महिन्यापासून विद्यार्थी शाळेपासून दूर होते आज विद्यार्थी शाळेत येताच सनई चौघडा याचे मंगल वाद्यांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले .शाळेचे उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक मंगल वाद्यांच्या सुरांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेची सुरुवात करण्यात आली.  शाळेचे हे दैवत आहे आणि त्याच विद्यार्थ्यांचे स्वागत मंगल वाद्यांच्या निनादात करण्यात आले.

पहिल्याच दिवशी शाळेत पन्नास टक्के उपस्थिती पूर्ण होती.मंगल वाद्य मुळे वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघ,रामदास कुलकर्णी, किरण धुळे, रशिद तडवी, श्रीमती रेखा हिवाळे, माणिक राठोड, शिक्षकेत्तर कर्मचारी पवन साळवे ,नितेश काळे आदींची उपस्थिती होती.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version