जालना दिवाळी हा नात्यांचा सण बहीण-भावाचं नातं पती-पत्नीचं नातं आईच आणि मुलाचं नातं वडिलांचा आणि मुलीचं नातं त्यामुळेच कदाचित या दिवाळीला नात्यांचा सण असंही म्हणतात असंच एक नातं राष्ट्रप्रेमी तरुणांनी जोडला आहे ते महा पुरुषांसोबत गेल्या सहा वर्षांपासून तरुणांचे एक मंडळ शहरातील विविध पुतळ्यांची दिवाळी निमित्त स्वच्छता करीत आहे  या उपक्रमाबद्दल कौतुकही होत आहे.

गेल्या ६ वर्षांपासून दिवाळी निमित्त, शहरातील राष्ट्रपुरुषांचा स्मारक परिसर स्वच्छता व अभिवादन कार्यक्रम राष्ट्रप्रेमी तरूणांकडून  केला जातो. ज्या महापुरुषांच्या त्याग-बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले , आणि त्यांच्यामुळेचआपण आपले सण-उत्सव साजरे करत आहोत, अशा राष्ट्रभक्तांप्रति आपली कृतन्यता व्यक्त करन्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.

ज्याप्रमाणे दिवाळी सणानिमित्त आपण आपले घर स्वच्छ करतो..आनंदोत्सव करतो परंतु ज्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य झालो त्या राष्ट्रपुरुषांना मात्र विसरतो त्यामुळे या उपक्रमांने त्यांचे स्मरण-अभिवादन केले जाते.यात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन हिंदुसूर्य श्री महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हुतात्मा जनार्दन मामा, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नेताजी सुभाषचंद्र बोस,लोकमान्य टिळक, हुतात्मा स्मारक, धर्मवीर छ.संभाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अमोल पाठक,गणेश लोखंडे, सौरभ पाठक,अमित कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

-दिलीप पोहनेरकर,9422219172
डाउनलोड https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version