जालना
पंधरा-वीस वर्षांपूर्वी टीव्हीवर सुरु असलेल्या सारेगामा या संगीत क्षेत्रातील मालिकेत एका पेक्षा एक सुमधुर आवाज ऐकायला मिळत होते. आणि त्या मधीलच एक आवाज होता कार्तिकी गायकवाड हिचा. तिने गायलेल्या “घागर घेऊन घागर घेऊन ,निघाली पाण्या गवळण” या गौळणीमुळे आणि या गवळणी च्या वेळी तिच्या झालेल्या हालचाली आणि हावभावांमुळे ती आबालवृद्धांना परिचित झाली .
आज मंगळवारी हीच कार्तिकी गायकवाड पुण्याहून जालन्यात मुद्दामहून कोरोना ची लस घेण्यासाठी आली होती. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्तिकीने आपल्या परिवारासह ही लस घेतली. यावेळी तिच्यासोबत तिचे पती रोहित कालिदास पिसे वडील कल्याणराव गायकवाड, आई सुनीता गायकवाड आणि भाऊ कौस्तुभ हे देखील उपस्थित होते.

दरम्यान याच वेळी महसूल आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांची देखील इथे उपस्थिती होती.यावेळी बोलताना कार्तिकी म्हणाली की, आपण जालना जिल्ह्यातील आहोत, त्यामुळे पुण्याहून जरी इथे आले असले तरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून आलेली आहे. अर्जुनराव खोतकर यांनी सारेगम नंतर आपला पहिला सत्कार केला होता. आणि त्यांच्यामुळेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. आणि त्यांचे आशीर्वाद मिळाले असेही ती म्हणाली.

Share.

Comments are closed.

Exit mobile version