जालना
covid-19 च्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून पोलीस प्रशासन रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, आणि दुसऱ्या टप्प्यात बुधवारी सदर बाजार पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिर पार पडले .सदर बाजार पोलीस ठाणे आणि ज्योती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरामध्ये 109 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.

पोलीस अधीक्षक विनायक देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपाधिक्षक सुधीर शिरडकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या रक्तदान शिबिरासाठी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन ,संजय व्यास, देविदास शेळके, यशवंत जाधव, या पोलिस अधिकाऱ्यांनी देखील इथे उपस्थित राहून संजय देशमुख यांना मदत केली. याच रक्तदान शिबिरामध्ये दोन अंध शिक्षकांनी देखील रक्तदान केले आहे.
पुढील टप्प्यात शुक्रवार दिनांक 14 रोजी चंदंजिरा पोलीस ठाण्यातही पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिर करण्यात आयोजित करण्यात आले आहे.

Share.

Comments are closed.

Exit mobile version