जालना- येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आणि याचे प्रदर्शन भरून इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम देखील ठरला. गेल्या दहा वर्षांपासून या शाळेचे शिक्षक रामदास कुलकर्णी हे हा उपक्रम चालवत आहेत.

कोरोना मध्ये दोन वर्षांपासून घरामध्ये बंदिस्त असलेली विद्यार्थी काही दिवसासाठी का होईना दिवाळीपूर्वी शाळेमध्ये आले होते.त्यानंतर लगेच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. या काही दिवसांच्या कालावधीमध्ये रामदास कुलकर्णी यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या उपक्रमाला पुन्हा चालना दिली आणि या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरी रिकामे न बसू देता त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू करण्याच्या सूचना केल्या.  त्याला मूर्त स्वरूप ही मिळाले. विद्यार्थ्यांच्या अंगातील कला गुण बाहेर आले आणि एक चांगले प्रदर्शन संस्कार प्रबोधिनी विद्यालया च्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.
यामध्ये जुन्या नाण्यांचा संचय, आकाश कंदील तयार करणे, यासोबत या प्रदर्शनात आकर्षण ठरले ते साई प्रसाद वैद्य या विद्यार्थ्याने रेखाटलेली चित्रे. आणि घरातील वाया जाणाऱ्या झाडू पासून तयार केलेले आकर्षक घरटे.
   प्रदर्शनाचे शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,सचिव विजय देशमुख, विनायकराव देशपांडे , प्रा. राम भाले ,केशरसिंह बगेरीया डॉ. जुगलकिशोर भाला आदींनी   कौतुक केले आहे .
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version