जालना- इनरव्हील क्लब ची आढावा बैठक डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सविता लोया यांनी मागील वर्षभरामध्ये इनरव्हील क्लब ने केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला.

तत्पूर्वी श्रीमती सिंह यांच्या आगमनानिमित्त चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली होती. दरम्यान यावेळी क्लब विषयी माहिती देताना सविता लोया यांनी वृक्षारोपण, नेत्र तपासणी शिबीर, आणि चंदंजिरा भागात असलेल्या जिवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्याची माहिती दिली, तसेच या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये शाळेला एलसीडी टीव्ही देणार असल्याचेही त्या म्हणाल्या त्याच सोबत अपंग महिलेला जयपूर फूट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.या आढावा बैठकीला इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सविता लोया, सचिव छाया हंसोरा , सुवर्ण करवा, स्मिता चेचानी, शितल मंत्री, काजल पटेल, प्रीती मलावत, यांची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version