जालना
औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यांना कामगार पुरविणाऱ्या लक्ष्मण घुमरे यांची गुरुवार दिनांक 13 रोजी भर दिवसा भर दुपारी खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने देखील सहा दिवसाच्या पोलिस कोठडीत आरोपींची रवानगी केली. काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्तावर उमरे यांचा खून करण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चंदंनजिरा भागातील सुंदरनगर येथे राहणाऱ्या श्याम चिकटे यांनी हा खून केल्याचा संशय व्यक्त केला. श्याम चिकटे हा लक्ष्मण घुमरे यांच्याकडे देखीलकाम करत होता. पोलिसांच्या पथकाने श्याम चिकटे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने बदनापूर येथील जितेंद्र आरसूळ याच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली.
तसेच पैशाच्या देवाणघेवाणीतून जुन्या भांडणातून हा खून केल्याचेही चिकटे यांनी कबूल केले. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावले आहे.

Share.

Comments are closed.

Exit mobile version