आरोग्य आणि स्वच्छता विभागावरून जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गदारोळ झाला. त्याच सोबत मागच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 15 व्या वित्त आयोगातून येणाऱ्या निधीपैकी समसमान म्हणजे 18 लाख रुपये विकास कामांसाठी  देण्यात येणार होते मात्र प्रत्यक्षात सोळा लाखांचे अंदाजपत्रक मागितल्यामुळे या सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कथा पदसिद्ध सचिव मनुज जिंदाल यांची उपस्थिती होती. कदाचित या जिल्हा परिषद सदस्यांची ही शेवटची सर्वसाधारण सभा असावी, त्यामुळे सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी आवर्जून हजेरी लावली, आणि जास्तीत जास्त निधीत पदरात पाडून घेण्याचा ही प्रयत्न केला. यासोबत गेल्या पाच वर्षात ज्या अधिकाऱ्यांवर या पदाधिकाऱ्यांचा रोश होता त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील लावून धरली होती. त्यामध्ये स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभाग आघाडीवर होता. आरोग्य विभागाने भरती केलेल्या 173 आरोग्य अधिकाऱ्यांपैकी 170 अधिकाऱ्यांना पाहिजे त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आणि उर्वरित 3 अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी इतर ठिकाणी पाठविले त्यामुळे हे अधिकारी हजर झालेच नाहीत आणि यांची सुनावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समोर सुरू आहे हा गैरप्रकार आहे. हे सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम मस्के यांनी सभागृहाला ताणून धरले आणि त्यांना साथ दिली ती जयमंगल जाधव यांनी .याच सोबत स्वच्छता विभागाचे जिल्ह्यामध्ये कुठेही काम नाही शौचालयाच्या कामात कुचराई करत अधिकाऱ्यांनी गैरकारभार केल्याचा आरोप अनिरुद्ध खोतकर यांनी केला .
*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version