जालना- सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ जालना च्या महिला मंडळांनी थंडीच्या दिवसात कुडकुडत असलेल्या बेघरांना मायेचं पांघरुन घातलं आहे.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सविता लोया, सचिव छाया हंसोरा, आणि सदस्य पुष्पा चेचानी यांनी शनिवार दिनांक 25 रोजी रात्री रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या बेघरांना रघ वाटप केली. गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे या परिसरात विसावणाऱ्या बेघरांना थंडी पासून बचाव करण्यासाठी हे पांघरून महत्त्वाचं ठरलं. याच सोबत नवीन जालन्यात शनी मंदिर बाहेर शनिवार च्या निमित्ताने बसलेल्या बेघरांना देखील या पांघरुणाचे वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसात मायेची ऊब मिळविण्यासाठी बेघरांची झुंबड उडाली होती.

*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna
