जालना- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊन मारण्याच्या धमक्या देणाऱ्या नाना पाटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.

जालना शहरातील गांधीचमन परिसरात भाजपाचे कार्याध्यक्ष सिद्धिविनायक मुळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध नोंदविण्यात आला. प्रारंभी नाना पाटोले यांच्याविरोधात घोषणाबाजी करून त्यांचे छायाचित्र असलेल्या बॅनर वर चपलांनी मारहाण केली, आणि त्यानंतर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच बोंब मारून निषेध व्यक्त केला.  पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नाना पाटोले यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. आजच्या या आंदोलनामध्ये रोहित नलावडे, करण झाडीवाले, मनोज इंगळे, अमित जाधव, अमर शिंदे, सुमित सुरडकर, सुहास मुंडे, योगेश सामलेटी, आदि भाजप पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version