जालना -कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नावाच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची नुकतीच हत्या  करण्यात आली. या हत्येचा विविध हिंदू  संघटनांनी निषेध नोंदवून  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. त्या हत्याऱ्यांना फाशी देऊन हत्या करण्यासाठी भाग पाडलेल्या या संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आज बुधवार दिनांक 23 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदुराष्ट्र सेना, यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी िल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्यामूळे जे विष पेरल्या गेले आहे त्याचा परिणाम आहे. असा आमचा अंदाज आहे. त्यामुळे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर बंदी घालावी. या संघटनांचा 1946 मध्ये भारतात घडलेल्या ॲक्शन चळवळीशी साधर्म्य असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे .शासनाने अशा संघटनांवर बंदी नाही घातली तर गांभीर्याने विचार करून हिंदू संघटना कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विधिज्ञ बालाजी वाघ, बजरंग दलाचे पदाधिकारी अर्जुन डहाळे, पवन भुरेवाल, शिवशंकर खिचडे, प्रतिक जाधव, गणेश सुंदरडे, अशोक पवार, ऋषिकेश काळे, सुभाष आंबेकर ,आदी कार्यकर्त्यांचा यावेळी समावेश होता.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version