जालना- हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील टिपुसुलतान चौकात रात्री महाआरती करण्यात आली. या महाआरती मध्ये सर्व पक्षीय आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते. जालना रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या टिपू सुलतान चौकात हनुमान जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 16 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जल्लोष ,आणि आनंदोत्सवात महाआरती करण्यात आली. विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्का अर्जुन डहाळे, सुहास मुंडे, धनु भय्या काबलीये, यांच्यासह अन्य पक्षांचे ही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान पोलिसांनी ध्वनिक्षेपकाला परवानगी नाकारल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी छोटेखानी महाआरती करून समारोप केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली आणि विद्युत रोशनाई करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रमाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर*
९४२२२१९१७२
https://edtvjalna.com