जालना- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील व्यापारी खरेदीसाठी जालन्याकडे येत असतांना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि यामध्ये सासु- जावयांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तिघांवर शासकीय रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत.

एरंडोल येथील व्यापारी सचिन सुखलाल पाटील (38) हे रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या काही सहकार्‍यांना घेऊन जालन्याकडे निघाले होते. रात्री उशीर झाल्यामुळे भोकरदन जवळच एका पेट्रोल पंपावर त्यांनी मुक्काम केला आणि सकाळी सात वाजेच्या सुमारास आपले वाहन घेऊन ते जालन्याकडे निघाले.

दरम्यान भोकरदन पासून जवळच असलेल्या बानेगाव पाटी जवळ आल्यानंतर जालन्याहून भोकरदन कडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना समोरून धडक दिली. या अपघातामध्ये छोटया हत्ती मध्ये असलेल्या कल्पना भरत पाटील आणि रामदास पाटील या सासू जावयाचा मृत्यू झाला आहे, तर चालक सचिन पाटील आणि त्यांचे मित्र भरत उत्तम पाटील (65) कल्‍पनाबाई गोविंद ठाकूर(50) या तिघांवर सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत. कल्‍पनाबाई ठाकूर यांच्यावर शासकीय रुग्णालय डॉ. संतोष राऊत यांनी प्रथमोउपचार करून खाजगी रुग्णालयात हलविले होते, मात्र कल्‍पनाबाई ठाकूर यांची तब्येत जास्तच खालावलेली असल्याने त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलविले आहे.

एरंडोल येथील हे व्यापारी जालन्यामध्ये कुरडई ,पापडी ,कडाकडी यासारखे सामान विक्रीला घेऊन जाण्यासाठी जालन्यात येत होते.

*बातमी अशी;जिच्यावर  तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
https://edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version