जालना
आज दिनांक 21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस ,तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणूनही आजच्या दिवसाला महत्त्व आहे. यानिमित्त योग्य भूमी परिवाराच्या वतीने शहरातील ज्वाला लॉन्स येथे प्राणायाम आणि योग शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान हे शिबीर पार पडले. योग आणि प्राणायाम झाल्यानंतर एरोबिक्सचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुखआणि उद्योगपती घनश्यामसेठ गोयल यांची उपस्थिती होती. त्यामुळे सहाजिकच त्यांनी सर्व योग साधकांसोबत प्राणायाम केले. आणि त्यानंतर आयोजकांच्या वतीने एरोबिक्स हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध गाण्यांवर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी धरलेला ठेका हा एक सर्वांसाठी वेगळाच विषय होता.

Share.

Comments are closed.

Exit mobile version