जालना-भारतीयस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारताच्या विविध कला आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरात असलेल्या श्री सरस्वती भुवन प्रशाला च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी आणि कोकण मधील “वारली” ही कला जपण्याचा प्रयत्न केला आहे.
निसर्गनिर्मित विविध वस्तूंवर आपल्या हाताने कलाकुसर करून त्या अधिक आकर्षक आणि टिकाऊ कशा होतील हा या वारली कलेचा मुख्य उद्देश हाच धागा पकडून या विद्यार्थ्यांनी श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या च्या पाठीमागे पडीक जागेत असलेल्या भोपळ्यावर वेगवेगळी कलाकुसर केली आहे. पेंग्विन, कासव, बदक, वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन या विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. रंगा शिवाय इतर कोणताही खर्च ही कलाकृती जपण्यासाठी येत नाही, फक्त आपली कल्पनाशक्ती मात्र पणाला लावावी लागते ,आणि तेच काम हे विद्यार्थी करत आहेत
*दिलीप पोहनेरकर,*
*९४२२२१९१७२*
https://edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*बातमी अशी;
जिच्यावरतुम्ही ठेवणार विश्वास!*