जालना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच माझ्या गाडीवर हल्ला केला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आहेत. असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच शरद पवार त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठे असतील ,मी त्यांना मोठं मानत नाही असेही पडळकर म्हणाले .

आज गुरुवारी एका लग्न समारंभानिमित्त ते जालन्यात आले होते. दरम्यान आधी काँग्रेस मध्ये आणि आता राष्ट्रवादी मध्ये वर्षानुवर्षे हेच लोक सत्तेत आहेत. त्यामुळे इतके वर्षे सत्तेत सत्तेत असतानाही माझ्या समाजावर अन्याय होत असेल तर यांच्याविरोधात नाही बोलायचे तर कोणाच्या? असा प्रश्नही त्यांनी केला.
त्यामुळे दुसऱ्यांच्या विरोधात बोलायचा विषयच नाही असेही ते म्हणाले.

Share.

Comments are closed.

Exit mobile version