जालना- वैद्यकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेल्या डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा एक जुलै हा वाढदिवस. त्यांच्या सन्मानार्थ हा वाढदिवस “डॉक्टर्स डे” म्हणून साजरा केला जातो.
खरंतर प्रत्येक डॉक्टर 365 दिवस काम करतात मात्र कुठेतरी सन्मान व्हायला हवा म्हणून त्यांचा हा वाढदिवस साजरा केला जातो . त्यानिमित्ताने जालन्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय .एम. ए .च्या वतीने यावर्षी एक जुलै हा वाढदिवस साजरा तर केलाच मात्र पुढील सातही दिवस विविध रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून हा सप्ताहच साजरा केल्या जात आहे. त्यापैकीच जालना शहरातील निरामय हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. विविध हॉस्पिटल मधून जमा केलेला रक्त साठा किती झाला आहे ते सप्ताह संपल्यानंतरच कळेल.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com