जालना
पेट्रोल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जालन्यात आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला.

आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास गांधीचमन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सरकारच्या कारभारामुळे पेट्रोल आणि डिझेलचे तसेच गॅस चे भाव गगनाला भिडले आहेत, आणि त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे, ही भाववाढ त्वरित रद्द करावी अन्यथा याहीपेक्षा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलनामध्ये माजी आमदार अरविंदराव चव्हाण, चंद्रकांत दानवे, बाळासाहेब वाकुळणीकर, रवींद्र तौर, जयंत भोसले, राजेंद्र जाधव, यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने, मनकर्णीका डांगे, साजिया शेख, आदि महिलांची देखील उपस्थिती होती.

Share.

Comments are closed.

Exit mobile version