जालना -मराठा समाजाचे आरक्षण हा विनोदाचा विषय होत आहे .मोर्चे आंदोलन भरपूर झाले आहेत ,मात्र हा प्रश्न आता घटनादुरुस्ती केल्याशिवाय होणार  सुटणार नाही. ही दुरुस्ती केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप ने करावी अशी मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे

मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राठवाड्याच्या दौर्‍यावर माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे निघाले आहेत. ते आज जालन्यात बोलत होते. दरम्यान पुढे बोलताना श्री जाधव म्हणाले की मूक मोर्चे क्रांती मोर्चे हे खूप निघाले आहेत, मात्र त्याने काहीच परिणाम झाला नाही .मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर घटनादुरुस्ती केल्याशिवाय ते मिळणार नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने ते करावे किंवा विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव आणून ही घटना दुरुस्ती करून घ्यावी ,आणि तरीही ही घटना दुरुस्ती झाली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात देशात वातावरण तयार होईल आणि त्याचा निश्चित फायदा आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमधून विरोधी पक्षाला मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

Share.

Comments are closed.

Exit mobile version