जालना- मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी बाजार मांडला आहे, आणि सरकारचीच आरक्षण देण्याची इच्छा नाही. असा आरोप अखिल भारतीय मराठा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी आज दिनांक 7 रोजी जालन्यात केला.

मराठवाडा दौऱ्यानिमित्त ते आज जालन्यात आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय मार्गदर्शक भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, पंजाबराव पाटील, यांच्यासह जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, संतोष जेधे, संदीप ताडगे ,राधेश्याम पवळ, नानासाहेब जोगदंड, नानासाहेब शिंदे, आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

      पुढे बोलताना  श्री जावळे म्हणाले की, राज्य सरकार आरक्षणा संदर्भात वारंवार केंद्राकडे बोट दाखवत आहे नेहमी असेच चालणार नाही, मराठ्यांच आरक्षण हे राज्य सरकारची देखील जबाबदारी आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही दोन समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यामधून आपली पोळी भाजून घेत आहे. भविष्यात मराठ्यांचा उद्रेक सरकारला पाहायला मिळेल असा इशाराही त्यांनी दिला .

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात स्वयंघोषित नेते तयार झाले आहेत आणि त्यांना हाताशी धरून समाजाची फसवणूक करण्याचेही काम पुढारी करीत आहेत अशा बांडगूळानां समाजाने त्यांची  जागा दाखवून द्यावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना ते काम करेल असा इशाराही त्यांनी दिला.

Share.

Comments are closed.

Exit mobile version