जालना-जालना शहरातील वाढत्या भटक्या जनावरांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा  महानगर पालिकेच्या आयुक्त आशिमा मित्तल यांनी कंबर कसली आहे. मनापाच्या संबंधित विभागांना कठोर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी जनावरे मोकाट फिरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास वाढत चालला आहे. शहरातील रस्यांेावर सोडल्या जाणाऱ्या भटक्या जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा आयुक्त जालना शहर महानगरपालिका आशिमा मित्तल यांनी दिले.

जिल्हाधिकारी  श्रीमती मित्तल यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, ज्या मालकांकडून जनावरे रस्त्यावर सोडली जातात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यक असल्यास कायदेशीर पावले देखील उचलली जातील. शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. मनपा, पशुसंवर्धन विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे याकरीता नियमित मोहीम राबविण्यात येणार आहे. भटक्या जनावरांना ताब्यात घेऊन शासकीय गो-शाळा येथे ठेवण्यात येईल, मालकांची ओळख पटवून नियमांनुसार दंड वसूल करुन सदरील जनावरे त्यांच्या मुळ मालकांना हस्तातंरित करण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी नागरिकांनीही या मोहिमेकरीता पुढे येत सहकार्याची विनंती केली आहे. रस्त्यावर जनावरे सोडणे ही कायद्याने दंडनीय कृती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ व सुरक्षित शहर आणि वाहतुकीला अडथळामुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले.****

ब्रॉडकास्ट लिस्ट आणि व्हाट्सअप ग्रुप ची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लिंक येईलच याची खात्री नाही. कृपया वाचकांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप चैनल च्या लिंक ला ॲड व्हावे ही विनंती.
Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version