छत्रपती संभाजीनगर- आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर या कार्यक्रमासोबतच कलाकारांची देखील उंची वाढविणारा हा श्री दत्त जयंती  महोत्सव .  छत्रपती संभाजी नगर येथे हा महोत्सव होत . यापूर्वी तो जालना जिल्ह्यातील अंबड या तालुक्याच्या ठिकाणी होत होता. दिनांक पाच सहा आणि सात डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पाच  सत्रांमध्ये हा कार्यक्रम होत आहे .समर्थ सांस्कृतिक मंडळ अंबड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर बातमी खालील व्हिडिओमध्ये.

* महोत्सवाची पार्श्वभूमी*
भणंग जळगांव (ता-घनसावंगी, जि-जालना) ,येथे सुरू केलेला दत्त जयंती संगीतोत्सव नंतर सुरू झाल्यापासून 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत अंबड (जि-जालना) येथे अव्याहतपणे सुरू होता,हा संगीतोत्सव अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने तो यावर्षीपासून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करूयात असे सूतोवाच १०० व्या संगीतोत्सवाच्या समारोप प्रसंगी या संगीतोत्सवाचे संस्थापक गायनाचार्य स्व. श्री. गोविंदराव जळगांवकर यांचे शिष्य तथा गेली ४० वर्षे संगीतोत्सवात सक्रिय असणाऱ्या श्री.सुनील कुलकर्णी यांनी केले तेव्हा स्व.अरविंद जळगांवकर ( स्व.गोविंदराव जळगांवकर यांचे जेष्ठ चिरंजीव) यांनी मान्यता दिली त्यानुसार यावर्षीपासून श्री.दत्त जयंती स्व.गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर स्मृती संगीतोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे लोकाश्रयावर हा महोत्सव यंदा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे.

गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर (भाऊ ) यांचे निधन होऊन आता २७ वर्षे झाली आहेत भाऊंची ओळख एकच,त्यांचं हिंदुस्थानी गाणं आणि दुसरं त्यांनी अखंडपणे केलेला हिंदुस्थानी संगीताचा प्रसार आणि गेली १०० वर्षे त्यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी- शिष्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवलेला श्री.दत्त जयंती संगीतोत्सव. भाऊंच्या हयातीत भाऊंनी अनेक गायक,वादक,रसिक,कार्यकर्ते संगीतोत्सवाशी जोडले पण त्यांच्या कार्याचं मोठेपण हे की त्यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेला अखंड संगीत यज्ञ आजही सुरु आहे. भणंग जळगांवहून अंबड आणि आता छत्रपती संभाजीनगर असा हा प्रवास झाला.*********

ब्रॉडकास्ट लिस्ट आणि व्हाट्सअप ग्रुप ची मर्यादा संपली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे लिंक येईलच याची खात्री नाही. कृपया वाचकांनी खालील दिलेल्या व्हाट्सअप चैनल च्या लिंक ला ॲड व्हावे ही विनंती.
Edtv News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
Follow You tube https://youtube.com/@edtvjalna5167?si=U3z9PKDBIQ4vPTAk
Web-www.Edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Leave A Reply

Exit mobile version