जालना-जुना जालना भागातील एका घराचा पाया खोदत असतांना रेणुका मातेचा दगडामध्ये कोरलेला तांदळा सापडला आहे. दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी मंदिर उभारण्याची मागणी केली आहे ,तर भूखंडाच्या मालकांनी ती मान्य करत इथे घरासमोर मंदिर बांधून ते सर्वांसाठी खुले करू असे सांगितले आहे.
जुना जालन्यातील शिवनगर भागामध्ये एक मोकळा भूखंड आहे. दरम्यान हा भूखंड कोणाचा आहे हे परिसरातील नागरिकांना माहीत नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथे घराचे बांधकाम करण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे या पायांच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेले होते .आज हे पाणी कमी झाल्यानंतर तिथे दगडामध्ये कोरीव काम केलेला रेणुका मातेचा तांदळा परिसरातील नागरिकांना दिसून आला, आणि क्षणार्धात महिलादेखील त्याची पूजा करण्यासाठी सरसावल्या होत्या .मात्र हा तांदळा खड्ड्यांमध्ये असल्यामुळे पूजा करता आली नाही. त्यानंतर हा तांदळा वर काढून महिलांनी यथोचित पूजा केली आणि त्यासोबत इथे मंदिर बांधावे अशी मागणी करू लागल्या. परंतु परिसरातील नागरिकांना हा भूखंड कोणाचा आहे हेच माहीत नाही त्यामुळे “ईडीटीव्ही न्यूज” च्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाकडे इथे मंदिर बांधण्याची मागणी केली आहे. त्यासोबत काही रहिवाशांचे म्हणण्यानुसार हा भूखंड एका समाजाच्या मंदिरासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा भूखंड विक्री करण्यात आला आणि आज तिथे बांधकाम सुरू आहे. दरम्यान महिलांनी पूजा केल्यानंतर या भूखंडावर दावा सांगणारे चंद्रशेखर त्रिंबकराव रत्नपारखी हे देखील या ठिकाणी आले. त्यांनी घरासमोरच रेणुका मातेचे मंदिर बांधून ते सर्वांसाठी खुले केले जाईल असे जाहीरही केले आहे .
दिलीप पोहनेरकर,
9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com