जालना -श्रीरामांवर असलेली अपार श्रद्धा आणि श्रीरामांचं भक्तावर असलेलं प्रेम याची साक्ष देणारा रामायणातील प्रसंग म्हणजे “शबरी”या मातेने रामाला दिलेली उष्टी बोरे. खरंतर खरे तर या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळ्या असू शकतो, परंतु श्रीरामांनी भिल्ल समाजातील या शबरी मातेची रामावर असलेली श्रद्धा- प्रेम या प्रेमामुळे माझ्या रामाला फलाहार म्हणून दिलेली बोरं आंबट लागायला नको. म्हणूनस्वतः अर्धवट खाल्लेली बोरं रामाला खायला दिली . अशी अपार श्रद्धा असणाऱ्या शबरी मातेचे मराठवाड्यात एकमेव मंदिर जालन्यात होत आहे. अन्य देवी देवतांची मंदिरे कुठेही, केव्हाही उभारली जातात परंतु मराठवाड्यात तरी हे असं पहिलंच शबरी मातेचे मंदिर जालना जिल्ह्यात श्री. संस्थान आनंदगडावर उभारणी सुरू आहे. शुक्रवार दिनांक 27 रोजी शबरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या मूर्ती सोबतच श्रीरामांची आणि लक्ष्मणाची मूर्ती ही इथे पाहायला मिळणार आहे.

खरंतर आनंदगड हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. फक्त देवी-देवतांसाठीच आनंदगडाचे महत्त्व नाही तर इथे क्रांतीगुरू लहुजी साळवे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, यांच्याही मूर्ती इथे पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व समाजाचे प्रतिनिधित्व या गडावरून केल्या जाते. आता समाजातील उपेक्षित असलेला घटक म्हणजे भिल्ल समाज आणि या समाजाचे प्रेरणादायी प्रतीक असलेली श्रीराम भक्त म्हणजे शबरी, यांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे होत आहे. या मूर्ती सोबतच अन्य काही प्रेरणादायी मूर्ती आनंदगडावर स्थापित होणार असल्याची माहिती या गडाचे अधिपती डॉ. भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिली आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version