जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या तक्रारींसाठी तक्रार निवारण दिन सुरू केला आणि तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त तक्रारी या ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारांच्या आहेत . हो मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्हा परिषद सभागृहामध्ये घनसांगी तालुक्यातील जांब समर्थ येथील इज्जतीची लक्तरे वेशीला टांगल्या गेले आहेत.
या चौकशीचे आदेशही श्रीमती वर्षा मीना यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दरम्यान चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्वतः स्थानिक निधी लेखापरीक्षकांनी दिलेल्या दिनांक 18 मार्च 2022 च्या पत्रात मान्य केले आहे. या पत्रानुसार 2016 -17 ते सन 2021 -22 या सहा वर्षांचे लेखापरीक्षण झाले नसल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यासंदर्भात ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी देखील मूग गिळून गप्प आहेत .झालेल्या प्रकरणाची माहिती विचारल्यानंतर त्यांचा “तीळ पापड होत आहे” चव्हाण यांच्या जोडीलाच राजाराम देवराव तांगडे यांनी देखील रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेल्या पैशाचा अपहार उघडकीस आणला आहे. मयत कुटुंबाच्या नावावर रोजगार हमी योजनेच्या मस्टरवर जिवंत दाखवून परस्पर पैसे उचलले आहेत. त्यामध्ये भगवान अंबादास तांगडे ,श्रीराम अश्रुबा तांगडे, आदींचा समावेश आहे. तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जांब समर्थ ग्रामपंचायत कडून सन 2020 ते 21 या कालावधीमध्ये बनावट सही शिक्के वापरून वृक्ष लागवड ,पानंद रस्ते, नाला पुनर्जीवित करणे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण या कामांमध्ये 44 लाख 14 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या दोन महत्त्वाच्या तक्रारींसह जिल्ह्यातील परतुर , जालना तालुक्यातील अनेक तक्रारींनी हा तक्रार दिवस गाजला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आता दर सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी या तक्रारींचा निपटारा करावा आणि तसे न झाल्यास तक्रारदारांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असेही आवाहन केले आहे. एकंदरीत ग्रामपंचायत स्तरावर होत असलेल्या भ्रष्टाचाराची लक्तरे आता जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये लटकायला लागली आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com