जालना -अवैध दारूच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ते संबंधित दारूच्या बाटल्या जप्त करतात, या बाटल्यांचे पुढे पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडतो .खरंतर या दारूच्या बाटल्या पोलिसांकडे साठवून ठेवल्या जातात आणि त्या नष्ट केल्या जातात .असाच सुमारे सव्वा दोन लाखांच्या दारूचा साठा चंदंनजिरा पोलिसांनी आज नष्ट केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये 62 गुन्ह्यात जप्त केलेल्या सुमारे 4000 बॉटल पडून होत्या. अशावेळी हा साठा नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. त्या परवानगीच्या अनुषंगाने आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा साठा नष्ट केला जातो. चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये आज पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या उपस्थितीमध्ये हा साठा नष्ट केला आहे. एक खड्डा खोदून त्यामध्ये बॉटल मधील सर्व दारू रिकामी केली जाते, आणि परत हा खड्डा बुजविला जातो अशा प्रकारे ही दारू नष्ट केल्या जाते.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com