जालना- इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रलच्या वतीने स्व. बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयात सौरऊर्जेवर आधारित “सूर्यकुंभ” नावाचा प्रकल्प करण्यात आला. या प्रकल्पामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्याच समोर तयार झालेले अन्न खायला मिळणार आहे.

जुना जालना भागातील योगेश्वरी नगर मध्ये असलेल्या या शाळेमध्ये इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रल च्या वतीने सौरऊर्जेचे महत्त्व आणि त्यापासून मिळणारे फायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना या कीटचेही वाटप करण्यात आले, जेणेकरून विद्यार्थी त्यांचे अन्न सौरऊर्जेवर चालणाऱ्या या सोलार कुकरमध्ये शाळेत देखील शिजवून खाऊ शकतील.
“सूर्यकुंभ” च्या तांत्रिक बाबी विवेक काबरा,आणि रितेश रायठ्ठा यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी यांच्यासह सहशिक्षिका संपदा काटे, प्रगती भालेकर, अलकनंदा गाडेकर, तसेच शिक्षक संदीप इंगोले, मदन सोजे, भीमाशंकर जवळकर यांनी त्यांना मदत केली. इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रल च्या अध्यक्षा अनघा देशपांडे यांच्यासह सचिव वैशाली मच्छावार माजी अध्यक्षा संगीता मोतीवाला सदस्य चंद्रिका मस्के यांची यावेळी उपस्थिती होती.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version