जालना- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र कुलाबा, मुंबई येथील वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी, पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यामध्ये दिनांक 13 आणि 14 साठी येलो अलर्ट जारी केला आहे .या दरम्यान विजेच्या कडकडाटासह 30 ते 40 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 15 आणि 16 एप्रिल रोजी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तविलेला आहे.


अशी घ्या काळजी
मेघगर्जनेसह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असेल तर झाडाखाली उभे राहणे टाळावे, तसेच अशावेळी वीज चमकताना विद्युत उपकरणे हाताळणे टाळावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.
हे करा वादळी वारे, विजा चमकत असतील आणि कोणी जर मोकळ्या जागेत असेल, तर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावेत व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये दाबावे.
अडचणीच्या वेळी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील 024 82- 22 31 32 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version