आनंदी स्वामी महाराज आषाढी महोत्सव

या उत्सवादरम्यान रोज संगीत सेवाही इथे महाराजांच्या चरणी अर्पण केली जाते. त्यामध्ये आज पैठण येथील प्रसिद्ध गायक मिलिंदबुवा गोसावी यांच्या परिवाराची गायन सेवा होती. जुन्या जालन्यातील श्री आनंद स्वामी संस्थान मध्ये covid-19 मुळे विविध उत्सवाला फाटा देण्यात आला आहे .मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून भाविकांना बाहेरूनच दर्शन घेण्यास सांगण्यात येत आहे. मात्र परंपरा खंडित पडू नये म्हणून संस्थानच्या वतीने गाभाऱ्यामध्ये काही मोजक्याच सेवेकर्‍यांची  ही गायन सेवा सुरू आहे. भाविकांनाही गाभाऱ्यामध्ये थांबू दिले जात नाही.  त्यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले असले तरी महाराजांच्या दर्शनासाठी आतुर असलेला भक्त उभ्याने आणि गडबडीमध्ये दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडत आहे. आज पैठण येथील सुप्रसिद्ध गायक मिलिंद बुवा गोसावी यांनी आपली गायन सेवा श्री आनंदी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्यांना साथ संगत देण्यासाठी तबल्यावर दीपक गुंजकर, पखवाज उदय मुंगिकर तसेच श्रेयस गोसावी ओंकार गोसावी ,चंद्रशेखर गोसावी आदींचे सहकार्य मिळाले.

*ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सुटू नयेत म्हणून  प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.edtv jalna app.

Share.

Comments are closed.

Exit mobile version