जालना- मानवाच्या जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालपणातच हे संस्कार होणे गरजेचे आहे. ज्या मानवावर संस्कार घडतात त्याच्या आयुष्याचा प्रवास सुखकर होतो. असे प्रतिपादन समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी जालन्यात केले .ब्राह्मण समाजाच्या वतीने दि.24 रोजी आयोजित करण्यात आलेल्या चाळीस बटूंच्या सामूहिक उपनयन संस्कारात बटूंना आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अनंत महाराज देशपांडे जाफराबादकर, नाना महाराज पोखरीकर, रवी महाराज जहागीरदार यांची उपस्थिती होती.

शहरातील पाठक मंगल कार्यालयात आयोजित या उपनयन संस्कार सोहळ्याला ाजकीय पुढार्‍यांनी देखील हजेरी लावली. उपनय संस्कारापूर्वी बटूंची चार बग्यांमध्ये बसून शहरात मिरवणूकही काढण्यात आली होती. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही मिरवणूक परत आल्यानंतर वेळेवर हा उपनयन संस्कार सोहळा पार पडला. दरम्यान पुढे बोलताना भूषण स्वामी म्हणाले की, मानवी जीवनाचे मूल्य हे संस्कारावर अवलंबून आहे. अनेकांना हे संस्कार म्हणजे शुल्लक गोष्टी वाटतात परंतु त्याचे मूल्य फार मोठे आहे. संस्कारामुळे परिवर्तन होते आणि त्याचमुळे जीवनाची वाट सुखकर होते.

गेल्या दोन महिन्यांपासून या समितीचे पदाधिकारी हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी झटत होते. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपा नेते भास्कर दानवे ,सिद्धिविनायक मुळे, आदींची उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष संतोष दाणी, कार्याध्यक्ष किरण मुळे, सचिव पवन देशमुख उपाध्यक्ष सुरेंद्र न्यायाधीश भगवान पुराणीक यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याचे पौरोहित्य नागेश महाराज पाथरूडकर यांनी केले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version