जालना- लॉयन्स क्लब ऑफ जालना यांच्या वतीने “दृष्टी रक्षक” या नेत्र तपासणी व्हॅन चे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.गरीब वस्ती, कारखाने,ग्रामीण भागात जाऊन रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट लायन्स क्लबचे आहे. त्या अनुषंगाने नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सुरेंद्र रिरोल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये दिनांक 6 जून रोजी कामगारांची तपासणी करण्यात आली.
तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार चष्म्याचे ही वाटप केल्या गेले आणि त्याही पुढे जाऊन जर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर लॉयन्स क्लबच्या चिखलठाणा येथील नेत्र रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. हा सर्व उपक्रम लॉयन्स क्लब ऑफ जालना आणि लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जात असून रुग्णांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमासाठी लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष किशोर देविदान यांच्यासह लॉ. सुरेश पांडे, राजेश कामड, विवेक मणियार, गजानन सारस्वत, हे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com