मंठा – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मंठा व शिवसेना ताुकाप्रमुख अजय अवचार यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था येथे फराळाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख अजय अवचार यांची उपस्थिती होती.या प्रसंगी व्यासपीठावर मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे,जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष दायमा तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार बाबाकाका कुलकर्णी
महिला संघाच्या अध्यक्षा सो.मंजुषा काळे उपाध्यक्ष रघुसिग जनकवर, अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज मदने यांची उपस्थिती होती.


वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज,बालक महाराज यांना शाबुदाणा खिचडी व केळी वाटप करण्यात आली.
कार्यक्रमास सरुवतीस पंढरीचा राजा पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी पत्रकार संघाचे प्रतिनिधी अमोल राऊत,आरून राठोड,विजयकुमार देशमुख, डॉ.आशिष तिवारी,रमेश देशपांडे,लखन जयस्वाल,आसाराम शेळके,मोसिन कुरेशी,जगदीश राठोड मानसिंह बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कुलकर्णी यांनी केले.

Share.

Comments are closed.

Exit mobile version