जालना विविध गुन्ह्यांमध्ये विशेष करून खून प्रकरणांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना पेन्शन पुरा भागात एका आरोपीच्या घरी धारदार शस्त्र सापडले आहेत . या आरोपीवर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.


गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात खून प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेला फरार असलेले आरोपी शोधण्याचे सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांनी विशेष पथके स्थापन करून ही शोध मोहीम सुरू केली होती. या आरोपींचा शोध घेत असताना पेन्शनपुरा भागामध्ये असलेल्या सलमान अब्दुल सलीम शेख याच्या घरी धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली .त्यानुसार स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी आज  सलमानच्या घरी छापा मारला .या छाप्यामध्ये तलवार, खंजीर, कुकरी ,अशा धारदार शस्त्रांचा साठा सापडला आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांच्या पथकातील सॅम्युअल कांबळे, विनोद गडदे, कृष्णा तंगे ,सचिन चौधरी, गोकुळसिंग कायटे ,गोपाल गोशिक, कैलास चेके यांनी हा छापा मारला.

ताज्या बातम्या पहाण्यासाठी,डाउनलोड करा https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version