जालना- स्वामी विवेकानंद म्हणाले होते” माझ्या मित्रांनो आपल्या शास्त्रातील सत्यांचा भारतात आणि भारताबाहेर प्रसार करण्याकरिता तरुण प्रचारकांना शिक्षण देणाऱ्या संस्था आपल्या देशात सुरू करण्याची माझी योजना आहे. माणसे हवी आहेत. इतर सर्व काही आपोआप जुळून येईल, परंतु सशक्त उत्साही, श्रद्धावान व निष्कपट अशी तरुण माणसे हवी आहेत. असे शंभर तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडविता येईल.”

स्वामी विवेकानंदांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेलं एक छोटंसं गाव म्हणजे  किन्होळा, हे गाव आता विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ओळखलं जाऊ लागलं आहे .जालना शहरात एका शाळेत शिक्षक असलेल्या शिक्षकाने हे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलला आहे. आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळत आहे. हळूहळू या विचारांची देवाण घेण्यासाठी ही मंडळी निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन हे विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.स्वतःच्या शेतात 3 एकर जागेत हे केंद्र सुरू केलं आहे आणि या शेतामध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे बियाणे रुजविण्यास सुरुवात केली आहे.

श्री. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरु शिष्यांनी जगाला भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे दर्शन घडवले. या दर्शनासोबतच त्यांनी राष्ट्रप्रेमाची ,राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवली .परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या राष्ट्रप्रेमाच्या विचारांना पुढे नेणारा वारसा मिळाला नाही .परंतु विचार कधीही मरत नसतात असे म्हणतात आणि त्याचा प्रत्यय देखील काही तरुण मंडळींच्या निमित्ताने पाहायला मिळाला .मूळचे बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी असलेले नारायण कौतिकराव भुजंग हे सध्या जालना येथील लोकमान्य विद्यालय, घायाळ नगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचसोबत किनोळा येथील स्वामी विवेकानंद आश्रमाचे ते कार्यवाहक देखील आहेत .शेतामध्ये धनधान्य पेरून त्यातून उत्पन्न न घेता विचारांची पेरणी करून समाजाला दिशा देण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनंजय पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत.

नारायण भुजंग यांच्या या प्रयत्नाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी झटणाऱ्या सदस्यांमध्ये संतोष खांदे, कैलास इंगळे, विजय गोपीकिशन राठी, एडवोकेट अशोक पंडित ,प्रा. दीपक चाटे ,शरद जोशी ,कौतिक कोलते, डॉ.जुगलकिशोर भाला, कृष्णा सुरेश चौधरी ,पवन कुमार खांदे, डॉ. मोहन शिंदे यांचा समावेश आहे.

  ताज्या बातम्या पहाण्यासाठी https://edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version