जालना -आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे .गुरूंच्या आशीर्वादाने आपण यशाचे शिखर गाठू शकतो, त्यासाठी गुरुभक्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येकाने गुरु करावा. असे प्रतिपादन रामदास महाराज आचार्य यांनी केले.गुरुपौर्णिमेनिमित्त जुन्या जालन्यातील श्रीराम संस्थान आनंदवाडी येथे प्रवचनात ते बोलत होते .

आज गुरुपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीराम संस्थान आनंदवाडी येथेदेखील कोरोना चे नियम पाळत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये पहाटे काकडा आरती झाली. यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांच्या आनंदाला पारावार नव्हता. महिला पुरुषांनी फुगडी खेळून हा आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुरोहितांच्या मंत्राच्या जयघोषात श्रींच्या पादुकांना अभिषेक तसेच श्री प्रल्हाद महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे पारायण करण्यात आले. आणि रामदास महाराज आचार्य यांच्या प्रवचनाने गुरुपौर्णिमेची सांगता झाली .

कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे साडेदहा वाजताच मंदिर बंद करण्यात आले होते .त्यामुळे आज गुरुपौर्णिमा असूनही भक्तांना गुरूंच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले.

*ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा edtv jalna app

Share.

Comments are closed.

Exit mobile version