नागपूर -समाधान मानण्यात आहे ,आपली हैसियत आणि आपली औकात यापेक्षाआपल्याला जास्त मिळालं आहे असं जर आपण समजलं तर माणूस जास्त आनंदी राहतो नाहीतर… मंत्रीपदासाठी नवा सूट शिवलेल्या इच्छुकांसारखं होतं .अशी मिस्कील टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकोई घडामोडींवर केली आहे. नागपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विद्यापीठ शिक्षण मंचच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नगरसेवक झाल्यावर समाधान न मानता आमदार झालो तर! आमदार झाल्यावर पुन्हा मंत्री झालो तर! मंत्री झाल्यावरही मनासारखे खात नाही मिळालं तर! पुन्हा दुःखी. एवढेच काय तर आपल्याला मंत्रिपद मिळेल या तयारीत असलेल्या इच्छुकांनी नवीन सूट शिवून ठेवला आहे. आता मंत्रीपदाचंच खरं नाही तर मनासारख्या मंत्रिपदाचे काय ?एवढ्या गर्दीत कोणाला काय मिळेल? आपल्याला संधी मिळेल का नाही या विचाराने ते दुःखी आहेत.आपला देश आणि समाज हा दुःखी आत्म्यांचा महासागर आहे त्यामुळे इथे समाधानी कमी आहेत असे प्रतिपादनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.दरम्यान विद्यापीठात उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले की आर्थिक दृष्ट्या आणि ज्ञानाच्या दृष्टीने आपला विद्यार्थी भविष्यात सक्षम व्हावा, जगात यशस्वी व्हावा, यासाठी शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी अर्थशास्त्र सोबतच विद्यार्थ्यांना समाजशास्त्राचे धडे देणेही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री. गडकरी यांनी केले .भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारात खूप मोठी ताकद आहे हे पटवून देताना त्यांनी स्वतःच्या घरचे उदाहरण दिले आहे. प्राध्यापक आणि शिक्षकांकडे पाहूनच समाज काम करत असतो, त्यामुळे या दोन्ही घटकांनी समाजाभिमुख काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com