जालना -येथील जेईएस महाविद्यालय, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटे सायंटिस्ट  प्रकल्प राबवविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी काम करणार्‍या स्वयंसेवकांचे पहिले प्रशिक्षण नुकतेच पार पडले विद्यार्थ्यांमध्ये  विज्ञाना विषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. पुणे ज्ञान प्रबोधिनीचे विशाल गायकवाड, अक्षय कुलथे आणि प्रकाश रणवरे  यांनी ऑन लाईन पद्धतीने स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाची सुरुवात विज्ञान गीताने झाली. दाब या संकल्पने वर आधारित वाटर कॅन पुश एयर, बाटली मधील फुगा, बॉटल शॉवर , लिक्विड प्रेशर आणि टुथपीक इनसाईड बलून या पाच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाब ही संकल्पना मांडण्यात आली.

या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. एस.बी. बजाज म्हणाले की, मागील सहा वर्षापासून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीरित्या चालू आहे व यावर्षी देखील कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान समजून घेण्यासाठी मदत होईल. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाइन आणि नंतर ऑफ लाईन  पद्धतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष रित्या उपक्रम घेण्यात येईल.

या उपक्रमात सहभागी होऊ इछिणार्‍या शाळांनी जिल्हा समन्वयक प्रा. करण सातुरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ जवाहर काबरा , डॉ. यशवंत सोनुने आणि ३० स्वयंसेवक ऊयापस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. करण सातुरे यांनी केले.

ताज्या बातम्या पहाण्यासाठी डाऊनलोड करा

*edtv jalna app*

 

 

 

 

Share.

Comments are closed.

Exit mobile version