जालना .जालन्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.कृष्णनाथ बी. पांचाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या बदलीचे आदेश काल जारी होताच आज डॉ. पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

सन 2016 च्या बॅचचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी 2013 पासूनच या IAS(भारतीय प्रशासन) सेवा ही परीक्षा देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान त्यांचे ग्रँड वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे हॉस्पिटल मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण झाले आहे. शिक्षण झाल्यानंतर जे.जे.हॉस्पिटल येथे सहा महिने त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून देखील काम केले .हे काम करत असतानाच त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला परंतु अवघ्या काही गुणांमुळेच त्यांना यश मिळाले नाही. 2014 मध्ये पुन्हा त्यांनी परीक्षा दिली यावेळी अवघ्या 19 मार्कावरून त्यांचं उद्दिष्ट मागे राहिलं कारण याच वेळी त्यांना परीक्षा देत असतानाच इतर ठिकाणी देखील काम करावं लागत होतं .अलिबाग येथे देखील त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे. दरम्यान 2014 मध्ये परीक्षा देताना ज्या काही मुलाखतीमधील , शुद्धलेखनातील चुका झाल्या पुन्हा होणार नाहीत याची त्यांनी काळजी घेतली आणि शेवटी यश संपादन केलं. डॉ. पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एका ठिकाणी सांगितला आहे की, ज्या वेळेस या परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस ते झोपेत होते . सरांनी मला फोन करून असा कसा रँक मिळवलास !असे म्हणत फिरकी घेतली. परंतु डॉ. पांचाळ यांना उत्तीर्ण होण्याची खात्री असल्यामुळे त्यांनी रँक विचारला आणि त्याच वेळेस सरांनी काही क्षण स्तब्ध राहून नंतर रँक सांगितला, दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. त्यामुळे स्वतःहून त्यांनी हा निकाल पाहिलाच नाही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस यादी पाहिली त्यावेळेस देखील थोडी धाकधूकच होती कारण कृष्णा पांचाळ असे सर्व परिचित नाव होते. यादीमध्ये प्रश्न पांचाळ असे नावच दिसत नव्हते , तिथे होते कृष्णनाथ पांचाळ पांचाळ असे नाव . त्यामुळे या नावाचे साधर्म्य असलेला विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसून आपणच असल्याची खात्री पटली अशी माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे.

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version