जालना- गेल्या 18 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेकरूंच्या” जय भोले मित्र मंडळाच्या” वतीने रविवारी शाही भंडाराच्या आयोजन करण्यात आले होते.
एखाद्या लग्नकार्याच्यापंक्तीप्रमाणे सुसज्ज असे मंगल कार्यालय घेऊन त्यामध्ये भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यासोबत तीर्थक्षेत्राहून परत आल्यानंतर दानधर्मालाही विशेष महत्त्व देत या मित्र मंडळाच्या वतीने चादर आणि साड्यांचे गोरगरिबांना वाटप करण्यात आले. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची यावेळी उपस्थिती होती अठरा वर्षांपूर्वी आठ भाविकांच्या जथ्थ्याने सुरू केलेला हा अमरनाथ यात्रेचा उपक्रम आज अडीचशे यात्रे करू या मित्रमंडळामध्ये आहेत.
-दिलीप पोहनेरकर-9422219172