जालना -आपल्याच विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सहकार्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देऊन लाच मागणारे दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

जालना शहरात मोतीबाग परिसरामध्ये पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे .या कार्यालयातून नुकतेच एक कर्मचारी चौकीदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीचे विविध लाभ मिळण्यासाठी कार्यालयात वारंवार चक्र मारल्या. त्यानंतर त्यांच्याकडे याच कार्यालयातील प्रथम लिपिक बाळासाहेब एकनाथराव रनेर वय 45 वर्ष राहणार हनुमान नगर ,मुकुंदवाडी छत्रपती संभाजी नगर आणि हरी विजयसिंग सोळंकी वय 35 वर्ष, वरिष्ठ लिपिक, राहणार सिंचन वसाहत जालना यांनी लाच मागितली.

हरी सोळंकी यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती ,त्यापैकी दहा हजार रुपये त्यांनी यापूर्वीच घेतले होते तर वेतन आयोगाच्या फरकाचा धनादेश देण्यासाठी प्रथम लिपिक बाळासाहेब रनेर यांनी आणि हरिसिंग सोळंकी यांनी उर्वरित दहा हजार रुपयांसाठी तगादा लावला. बाळाप्रसाद रणेर याने पाचव्या वेतन आयोगाच्या हप्त्याचा चेक देण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तर हरी सोळंकी यांनी जीआयएस चा चेक देण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने दहा हजार रुपये ज्यावेळेस दिले त्यानंतर लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची शहानिशा करून आज कार्यालयाच्या परिसरातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये बाळाप्रसाद रणेर हे 4000 रुपयांची तर हरी सोळंकी हे सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेले आहेत .या दोघांवरही कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आपल्याच कार्यालयातील आपल्याच सहकार्याकडून सेवानिवृत्तीनंतर त्याला त्रास देऊन लाच घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांबद्दल पाटबंधारे विभागामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.——–

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version