Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    महिकोच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?; पालकाची जीवाचे बरे वाईट करण्याची मनस्थिती

    विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिळणार “शिष्यवृत्ती”

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » मास्टर की चे पाच मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात; गाड्या चोरण्याची पोलिसांसमोर रंगीत तालीम
    Jalna District

    मास्टर की चे पाच मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात; गाड्या चोरण्याची पोलिसांसमोर रंगीत तालीम

    EdTvBy EdTv12/08/2023No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- चार चाकी वाहनांची चोरी झाल्यानंतर अनेक वेळा ही वाहने सापडतच नाहीत या वाहनांची तोडफोड करून इतर राज्यात विकले जातात. असाच गोरख धंदा बुलढाणा जिल्ह्यातील धाड करडी येथील एक कुटुंब करत होतो. दरम्यान जालन्यात दिनांक 10 ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या एका चार चाकी वाहनामुळे या परिवाराचा हा गोरख धंदा उघडकीस आला आहे आणि” मास्टर की” च्या माध्यमातून वाहने चोरणारे हे पाच “मास्टर माईंड” स्थानिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात सापडले आहेत. एवढेच नव्हे तर ते गाडीची चोरी कसे करायचे याची रंगीत तालीम ही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना करून दाखवली.

    सदर बाजार हद्दीतून पंजाबराव शेषराव पवार, राहणार वंश ब्लूबेल्स सोसायटी जालना यांची स्विफ्ट कंपनीची कार दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यादरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली आणि आरोपी शेख अफजल शेख दाऊद वय 22 वर्ष राहणार धाड करडी तालुका बुलढाणा हल्ली मुक्काम गुलशन नगर, चिखली जिल्हा बुलढाणा, याने त्याच्या इतर साथीदारांसह ही कार चोरी केल्याची माहिती मिळाली .त्या अनुषंगाने पोलिसांनी चिखली येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले असता पोलिसांना इतरही आरोपी हाती लागले आहेत. त्यामध्ये शेख फरदीन शेख युसूफ,वय 19 वर्ष ,राहणार संजय नगर देऊळगाव राजा, शेख दाऊद उर्फ बब्बू शेख मंजूर वय 56 वर्ष, शेख राजा शेख दाऊद वय 24 वर्ष ,अरबाज शेख दाऊद वय अठरा वर्ष, हे सर्व धाड करडी तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम गुलशन नगर चिखली जिल्हा बुलढाणा येथे राहत आहेत. त्यांच्याकडून चोरी गेलेली स्विफ्ट डिजायर आणि आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची एक्स यु व्ही 300 तसेच बनावट चावी तयार करण्यासाठी ऑनलाईन मागविलेले सॉफ्टवेअर आणि इतर साहित्य असे एकूण नऊ लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे सराईत चार चाकी वाहन चोर आहेत आणि त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत .आरोपीचा एका मुलाला बीड पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्या जमानतीसाठी पैसे जमवाजमव करण्याच्या उद्देशाने त्यांनी आणखी वाहन चोरी करून ते विकण्याचा धंदा सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे ,यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, गोकुळसिंग कायटे ,विनोद गडदे, कृष्णा तंगे ,सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप ,देविदास भोजने ,कैलास चेके आदी कर्मचाऱ्यांनी लावला.

    edtv jalna news App on play store,
    web-edtvjalna.com
    you tube-edtvjalna
    Dilip Pohnerkar-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    jalna lcb obdstar keymaster xuv-300 बुलढाणा चिखली मास्टर की मास्टर माईंड सदर बाजार पोलीस स्थानिक गुन्हे शाखाjalna sp
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमणिपूर प्रश्नी रा.काँच्या महिला आघाडीचा मूक मोर्चा ;विद्यार्थिनींची संख्या जास्त
    Next Article डेंगू मुळे पुन्हा एका तरुणीचा मृत्यू; खाजगी हॉस्पिटल चा रिपोर्ट हिवताप अधिकाऱ्याला अमान्य
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    महिकोच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?; पालकाची जीवाचे बरे वाईट करण्याची मनस्थिती

    13/11/2025

    विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश

    10/11/2025

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिळणार “शिष्यवृत्ती”

    06/11/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,060 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,101 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,234 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,213 Views
    Don't Miss
    Breaking News 13/11/2025

    महिकोच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?; पालकाची जीवाचे बरे वाईट करण्याची मनस्थिती

    जालना-महिको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट संचलित जालना येथे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय आहे .या महाविद्यालयाला  नॅक अ…

    विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिळणार “शिष्यवृत्ती”

    गुंडेवाडी- कुंभेफळ शिवारात बनावट भूखंड पाडून विक्री ;आरोपीची आज संपणार पोलीस कोठडी

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    महिकोच्या बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ?; पालकाची जीवाचे बरे वाईट करण्याची मनस्थिती

    विशेष बातमी:IAS अधिकाऱ्यांच्या “फोकस” मुळे पडणार 50 विद्यार्थ्यांच्या जीवनात IIT प्रकाश

    आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिळणार “शिष्यवृत्ती”

    Most Popular

    महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जमा झाला 166 बॅग रक्त साठा

    01/05/20210 Views

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.