अंबड- तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे पाच सहा दिवसापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी काल दिनांक एक सप्टेंबर रोजी लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्यादरम्यान जमावाने देखील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आहे. या दगडफेकीमध्ये अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पुरुष कर्मचारी जखमी झाले आहेत .जालना येथील सामान्य रुग्णालयात 18 पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. याच पद्धतीचे उपचार घनसावंगी येथीलही उपजिल्हा रुग्णालयात देखील सुरू आहेत.

जालना सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये श्रीनिवास गुट्टूर, शिवप्रसाद लकडे, मारुती वैराळ, दिपाली पवार, मीरा ठोके, विजय कुंडलकर, धर्मेंद्र खांडेकर, विष्णू कुडमते, सुरेश गायकवाड, मनीषा पुंगळे, बाबा भुरेवाड, रेणुका बडे, लक्ष्मी दलंगे, आरती साबळे, रेणुका नागरे, यांचा समावेश आहे.

edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version