Jalna Districtजालना जिल्हा

खादी व ग्रामोद्योग कडे गहाण ठेवलेल्या”या” मालमत्तांचा होणार लिलाव

जालना-जालना तालुक्यातील  खालील कसुरदार यांच्याकडुन  म.रा. खादी व ग्रामोद्योग यांची थकीत रक्कम वसुल करण्यासाठी कसुरदार यांना जमीन महसुलाची  थकबाकी म्हणुन नमुना 1 व 2 ची नोटीस देण्यात आली होती. परंतु कसुरदार यांनी अद्यापपर्यंत रक्कम भरणा केला नसल्याने कसुरदार यांनी गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या लिलाव खालीलप्रमाणे ठेवण्यात आला असुन  या मालमत्तेच्या लिलावात जालना तालुक्यातील जनतेनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा तसेच कसुरदार यांनी लिलावाच्या दिनांकापुर्वी ही रक्कम भरण्याचे आवाहन  तहसिल कार्यालय, जालना यांच्यामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कसुरदारांची यादी व लिलावाचा तपशिल पुढीलप्रमाणे-

            बबन गेणाजी क्षीरसागर रा. सोलगव्हाण, गट नं. 166 क्षेत्र 1 हे. 96 आर,थकीत रक्कम 83 हजार 813 रुपये,  लिलाव  दि . 12 जानेवारी 2022 रोजी सोलगव्हाण येथे वेळ सकाळी 11.00 वाजता, नारायण भाऊराव राठोड रा. पाथ्रुड  गट नं. 112 क्षेत्र 0 हे 20 आर,  थकीत रक्कम 99 हजार 397 रुपये, लिलाव दि . 12 जानेवारी, 2022 पाथ्रुड  येथे  सकाळी 11.00 वाजता,  निवृत्ती बाबुराव खंडागळे रा. धानोरा, गट नं. 99 क्षेत्र 0 हे. 54 आर, थकीत रक्कम 63 हजार 868 रुपये, लिलाव दि . 12 जानेवारी 2022 रोजी धानोरा येथे सकाळी 11.00 वाजता, विठ्ठल ज्ञानदेव नागवे              रा. वानडगाव, गट नं. 95, 01 हे. 20 आर, थकीत रक्कम 1 लाख 26 हजार 775  रुपये  लिलाव दि. 14 जानेवारी 2022 रोजी वानडगाव  येथे  सकाळी 11.00 वाजता, नारायण भगवान राठोड रा. जळगाव गट नं. 83 क्षेत्र 0.54  आर  थकीत रक्कम 1 लाख  36 हजार 113  रुपये लिलाव दि. 12 जानेवारी, 2022 रोजी  जळगाव सोमनाथ  येथे सकाळी 11.00 वाजता, बद्रुद्दीन मोहम्मद फैजोद्दीन  रा. बेथलम गट नं. 13 क्षेत्र 0.20 आर थकीत रक्कम  96 हजार 99 रुपये, लिलाव दि. 13 जानेवारी 2022 रोजी बेथलम येथे सकाळी 11.00 वाजता, शिलाबाई माधवराव लोखंडे रा. तातेवाडी गट नं. 49  थकीत रक्कम 11 हजार 389 रुपये लिलाव दि. 13 जानेवारी 2022 रोजी तातेवाडी येथे सकाळी 11.00 वाजता होणार असल्याचेही तहसिल कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*दिलीप पोहनेरकर*,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.