Jalna District

शाबासकी मिळविण्यात स्थानिक गुन्हा शाखेचा बोलबाला

जालना- तपासकामात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जालना पोलीस दलात असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना चे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले . यावेळी पालकमंत्र्यांच्या सोबत िल्‍हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांचीही उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. या ध्वजारोहणानंतर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रोकड जालन्याहून गोलापांगरी कडे घेऊन जात असताना भर दिवसा लुटून नेली होती, या प्रकरणाचा तपास तसेच अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलढाणा अर्बन बँकेवर भरदिवसा दरोडा टाकून रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा गुन्हा शाखेने अल्पावधीतच तपास लावून आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. या दोन प्रमुख गुन्ह्याच्या तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी लावला होता. त्याचसोबत उच्चभ्रू वस्तीमध्ये राहून महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या आणि विविध पोलिस ठाण्यात 20 गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला पोलिस जमादार कृष्ण तंगे आणि सचिन चौधरी यांनी पकडून त्यांच्याकडून नऊ लाख  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. याप्रकरणी देखील या दोघांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.

आज स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) सन्मानित करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी पुढील प्रमाणे. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी विनोद गडदे, गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, दत्तात्रय वाघुंडे, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, महिला पोलीस कर्मचारी गोदावरी सरोदे, यांचा समावेश आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.