Jalna District

उपोषणानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जालना- थकित महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, सणासाठी उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये त्वरित देण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी एस. टी. महामंडळाचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

जिल्ह्यातील सुमारे साडे तेराशे कर्मचारी संपावर गेल्यामुळे खराब झालेल्या एसटी बसेस आता दुरुस्त करायचा कोणी? हा मोठा यक्षप्रश्न एसटी महामंडळ समोर आहे. त्यामुळे जोपर्यंत बस सुस्थितीत आहे तोपर्यंतच ती धावेल अन्यथा डेपोमध्ये उभी राहणार आहे. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या कामगारांचे वेतन वेळेवर मिळत नाही, राज्य परिवहन प्रशासनाने दिनांक 30 जून 2018 ला परिपत्रक काढले होते आणि त्यानुसार वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के व घरभाडे भत्त्याचा वाढीव दर मान्य केला होता, मात्र अजूनही तो लागू झालेला नाही .


राज्य शासनाने दिनांक 1 1 ऑक्टोबर 2019 पासून भत्त्याच्या दरामध्ये 17 टक्क्यांवरून 28 टक्के अशी वाढ केलेली आहे. हा महागाई भत्ता माहे ऑक्टोबर च्या वेतानासोबत रोखीने देण्याचे मान्य केले आहे तो त्वरित देण्यात यावा. शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या महागाई भत्त्याचा दर 28 टक्के लागू असताना रा. प. कर्मचाऱ्यांना मात्र ऑक्टोबर 2019 पासून ते आत्तापर्यंत फक्त बारा टक्के महागाई भत्ता दिला जातो. हा एसटी कामगारांवर अन्याय असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
या आणि अन्य काही मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाचे हे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या मंडळाच्या सतरा संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहे.काल पाच जणांनी सुरू केलेल्या उपोषणाला सर्वच कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषणासाठी पी.टी. कर्वे, जे.पी. देशमुख, व्ही.जी. भारती, पी.पी. बोडले, प्रवीण कुलकर्णी हे बसले आहेत.

-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.