Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » गरिमा रियल इस्टेट फसवणुकीतील मुख्य सूत्रधाराला सहा वर्षानंतर जामीन; गुंतवणूक परत मिळण्याच्या अशा पल्लवीत
    Jalna District

    गरिमा रियल इस्टेट फसवणुकीतील मुख्य सूत्रधाराला सहा वर्षानंतर जामीन; गुंतवणूक परत मिळण्याच्या अशा पल्लवीत

    EdTvBy EdTvSeptember 24, 2024Updated:September 24, 2024No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना सध्या गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या घोटाळ्याप्रमाणेच सन 2017 -18 मध्ये अशाच प्रकारचा रियल इस्टेटमध्ये घोटाळा झाला होता .राजस्थान मधील तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी एकत्र येत महाराष्ट्रातील वर्धा छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी ,आणि जालना या भागातील गुंतवणूकदारांना लुटले होते. कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा होता. गरीमा रियल इस्टेट  प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी होती.

    niramy

    nrg

    सन 2010 ते 15 दरम्यान जालना जिल्ह्यात राजस्थान येथील धोलपूर जिल्ह्यात असलेल्या बनवारीलाल माधवसिंह कुशवाह यांनी त्याचे नातेवाईक शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिशन माधवसिंह कुशवाह, शोभाराणी बनवारीलाल कुशवाह, बनवारीलाल हरिभाऊ लोधी, जितेंद्र कुमार रामनाथ कुशवाह, विजेंद्र पालसिंग लोधी ,आणि धीरज गुलाब सिंह पाटील यांच्या मदतीने सन 2007 -08 मध्ये गरिमा रियल इस्टेट अँड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. सन 2011- 12 मध्ये साथी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी ही आणखी एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीचे धीरज पाटील वगळता सर्व जण काही दिवस संचालक म्हणून काम करत होते . धीरज पाटील हे महाराष्ट्रातील व्यवसायासाठी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत होते. छत्रपती संभाजी नगर येथील द्वारकापुरी, स्टेशन रोड बन्सीलाल नगर,  येथे मोहन श्रीनिवास मोहोळकर यांच्या मालकीच्या इमारतीत बत्तीस हजार रुपये महिना प्रमाणे भाडेतत्त्वावर कार्यालय देखील सुरू केले होते .या कार्यालयात बसून धीरज गुलाबसिंग पाटील रा. अथर्व, अशोक नगर जळगाव हे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील जनतेला वेगवेगळ्या योजना सांगून एजंट मार्फत गुंतवणूक करत होते .गुंतवणुकीच्या बदल्यात महाराष्ट्रात कुठेही प्लॉट देण्याचे आमिष त्यांनी दाखविले. आणि बनावट इसार पावती देखील ते करत होते .या गुंतवणुकीमध्ये छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, परभणी, आदी ठिकाणी जमा झालेली रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जात होती .गुंतवणुकीतून जमा झालेली रक्कम आरोपी शिवराम माधवसिंह कुशवाह व बालकिशन माधवसिंह कुशवाह यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका अंतर्गत मौजे कोंडवे येथे स्वतःच्या नावावर शेतजमीन खरेदी केली तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवारीलाल कुशवाह यांनी त्याचा मित्र गोरेलाल कुशवाह व लहान भाऊ मखनलाल कुशवाह यांच्या नावावर देखील मौजे कोंडवे येथे शेतजमीन खरेदी केली. दरम्यान ज्यावेळी गुंतवणूकदारांचे पैसे किंवा प्लॉट  देण्याची वेळ आली आणि गुंतवणूकदारांनी तगादा लावला त्यावेळेस त्यांचे पैसे मिळाले नाहीत. एवढेच नव्हे तर प्लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी एका सोबत दुसरा आणखी एखादा ग्राहक आणला तर त्याला दोन टक्के कमिशन ही मिळायचे. त्यामुळे लवकरच हा धंदा वाढत गेला. सण 2018 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा, छत्रपती संभाजी नगर, रत्नागिरी, जालना या ठिकाणी फसवणुकीचे चार गुन्हे दाखल झाले आणि या सर्व गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. जालना जिल्ह्यात 1712 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती आणि याचा तपास जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. 1712 गुंतवणूकदारांची 4 कोटी 81 लाख 27 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बनवारीलाल माधवसिंह कुशवाह याला दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळ पासून बनवारीलाल सुरुवातीला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी अशा गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयाच्या ताब्यात आहे. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील न्यायालयाने कुशवाहाला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कुशवाह याची पोलिसांनी 2018 मध्ये गोठवलेल्या 200 कोटींच्या मालमत्तेची किंमत आज दुप्पट झाली  असेल आणि या गुंतवणुकीची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा युक्तिवाद वकिलाने केल्यामुळे न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    bolodabazar ch. sambhajinagar chitfund case court dnyanradha EOW JALNA garima real estate jalna jalna crime jalna न्युज madhya pradesh vardha गरिमा रियल इस्टेट फसवणूक मध्य प्रदेश राजस्थान
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“अभूतपूर्व मोर्चा आणि बंदला” “अभूतपूर्व” प्रतिसाद
    Next Article शिक्षक संघटना एकवटल्या; असहकार आंदोलन पुकारणार?
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    July 2, 2025

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    July 2, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025910 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 2, 2025

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    जालना- कोविड 2019 मध्ये बहुतांश जनता ही घरीच होती .विशेष करून महिला आणि तरुणींनी युट्युब…

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.